रत्नागिरी-मडगाव ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

रत्नागिरी : रत्नागिरी ते मडगावदरम्यान धावणारी रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस ही दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत बंदच राहणार असल्याचे कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
आधी गोव्यानजीनक रेल्वे मार्गावरील बोगद्यातील कामामुळे मागील उन्हाळ्यापासून तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी-मडगाव (१०१०१/१०१०२) या गाडीचा रद्द केलेला कालावधी दि. ३१ डिसेंबरपर्यंत वाढण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या गाडीचा रेक वापरुन रत्नागिरी किंवा मडगाव ते मुंबईपर्यंत सुविधा श्रेणीतील गाडी चालवण्यात यावी, अशी मागणी कोकणातील प्रवासी जनतेकडून करण्यात आली आहे
Comments
Post a Comment