संपत्तीचा वाद टोकाला गेला, पुतण्याने काकाच्या तोंडात दारुगोळा कोंबला अन्…

मालमत्ता वादाचा बदला घेत पुतण्याने हा धक्कादायक प्रकार केला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून जखमी काकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालमत्ता वादाचा बदला घेत पुतण्याने हा धक्कादायक प्रकार केला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून जखमी काकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फटाक्यांच्या हादऱ्याने अत्यंत गंभीर दुखापत
पुतण्याने अन्य दोन आरोपींच्या साथीने घडवून आणलेला हल्ला अत्यंत भयानक होता. तोंडामध्ये फटाक्यांचा जबरदस्त हादरा बसल्यामुळे पीडित काकाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे दुखापत झाली आहे. त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी पुतण्याने मालमत्ता वादातून याआधी कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत, याचाही तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे. तसेच हत्तीचा प्रयत्न करण्याच्या कटात कुटुंबातील आणखी कोणी कोणी सहभागी आहे का, त्याचा देखील शोध घेतला जात आहे.
पीडितेच्या बहिणीकडून तक्रार दाखल
पीडित व्यक्तीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्या आधारे अधिक तपास सुरू आहे. सायबर सिटीच्या सोहना परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
जखमी काकाला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक बनवल्याने सफदरजंग रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
आरोपी जितेंद्र व त्याच्या मित्राला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी संभाव्य ठिकाणी शोध मोहीम राबवून त्या परिसरांना घेरले आहे.
घराशेजारील शेतात घडली घटना
पीडित व्यक्ती दिवाळीच्या रात्री जवळच असलेल्या शेतामध्ये गेला होता. याची खबर लागताच आरोपी पुतण्याने अन्य दोन मित्रांना सोबत घेऊन शेत गाठले आणि काकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
काकाच्या तोंडामध्ये दारूगोळ्याने भरलेला पाईप टाकून बॉम्ब फोडण्यात आला. यादरम्यान आरोपीने आपल्या भावाच्या पोटात गोळी देखील मारली. बॉम्बचा स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक रहिवाशांनी तातडीने शेतात धाव घेतली. रहिवाशांना पाहून आरोपींनी तातडीने तेथून पळ काढला.
Comments
Post a Comment