मावळते पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना पुष्पवृष्टी करत निरोप

 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शांत जिल्हा आहे, असे सुरुवातीला आम्हाला वाटले होते. पण नंतर जेव्हा कामाला सुरुवात केली. तेव्हा एकामागोमाग एक घटना घडू लागल्या. आम्ही या सगळ्या गोष्टींवर योग्य ती कामगिरी केली.

अनेक महत्वाचे गुन्हे आम्ही उघडकीस आणले. जिल्ह्यात विविध योजना आणि उपक्रम राबवले. हे उपक्रम याहीपुढे सुरू रहावेत अशी अपेक्षा आहे. मला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना सर्व अंमलदार आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले असे उदगार मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी काढले. ते पोलीस मैदानावर आयोजित निरोप समारंभात बोलत होते. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप दिला.

पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित निरोप समारंभाप्रसंगी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि.प. च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इदुराणी जाखत आणि डॉ. मोहितकुमार गर्ग यांचे आईवडील उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातू डॉ. मोहितकुमार गर्ग यांना • पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करताना मोहितकुमार गर्ग आणि डॉ. इंदुराणी जाखड यांचे खूप उज्ज्वल भविष्य आहे. त्यांना पुढे आणखी सेवा बजावायची आहे. ते आणखी मोठ्या पदावर विराजमान होतील अशी आशा व्यक्त केली. आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी आपण केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

कोविड काळात पोलिसांसाठी उभारलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती दिली. अनेक महत्वपूर्ण निर्णय आणि महत्वपूर्ण उपक्रम आपण सुरु केले. आपल्या कामात सर्व अंमलदार आणि अधिकाऱ्यांचा सहकार्याचा वाटा आहे. काम करताना माझ्याकडून जर काही चुक झाली असेल तर मला तुम्ही माफ करावे असे त्यांनी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमात शेवटी डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना निरोप देण्यात आला.

Comments