सूर्या आणि राहुलची धमाकेदार फटकेबाजी, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ठेवले मोठे आव्हान

 सूर्या आणि राहुलची धमाकेदार फटकेबाजी, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ठेवले मोठे आव्हान

 

India vs Australia Official warm up match -टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचलेला भारतीय संघ ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर पहिला सराव सामना खेळत आहे. हा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जात आहे. या सामन्याचा पहिला डाव संपला असून भारताच्या फलंदाजांनी ताबडतोड फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली.

ब्रिस्बेन: टी-२०विश्वचषक २०२२ मधील ऑफिशिअल सराव सामना आज भारत ऑस्ट्रलियाविरुद्ध खेळत आहे. हा सराव सामना गाबा स्टेडियममध्ये खेळला जात असून ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम गोलानजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताच्या फलंदाजांनी आपली चांगली कामगिरी केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला १८७ धावांचे लक्ष्य दिले आहे.

भारताची फलंदाजी (१८६/७, २० षटके)

केएल राहुल (५७) आणि सूर्यकुमार यादव (५०) यांनी भारताकडून शानदार खेळी खेळली. २० षटकात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ७ गडी गमावून १८६ धावा केल्या. हा सराव सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला १८७ धावांची मजल मारावी लागणार आहे. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय भारताकडून रोहित शर्माने १५, विराट कोहलीने १९, दिनेश कार्तिकने २० आणि हार्दिक पंड्याने २ धावा केल्या.

भारताने ५ षटके पूर्ण होण्याच्या आधीच नाबाद ५० धाव पूर्ण केल्या. सूर्याने दमदार खेळी दाखवत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक केले. पॉवरप्ले संपताच भारताची धावसंख्या नाबाद ६९ धाव होती. राहुल ३३ चेंडूत ५७ धावा करत मॅक्सवेलच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यांनतर लगेचच रोहित शर्मा १५ धावा करत अगरच्या चेंडूवर झेलबाद झाला. १० षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद ८९ होती. त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार क्रीझवर आले आणि सूर्याने आपल्या धावांचा पाऊस पांड्याला सुरुवात केली. नंतर १९ धाव करत कोहली बाद झाला. नंतर आलेला पंड्या डॆहील २ धाव करत झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने २० धावा केल्या आणि तो ही बाद झाला आणि सूर्या शतक पूर्ण करत पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारतीय संघ
रोहित शर्मा (क), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (व), दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

ऑस्ट्रेलिया संघ:
ॲरॉन फिंच (क), मॅथ्यू वेड (डब्ल्यू), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा , जोश हेझलवूड

 

Comments