गुलाबी थंडीची चाहूल..

रत्नागिरी : ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बरसलेल्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे
गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. थंडीची चाहूल लागल्याने गरम कपडे विक्रेत्यांचेही आगमन झाले आहे.
पुढील आठवड्यात कमाल तापमानात घसरण होण्यासह थंडीचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पाऊस गेल्याने थंडीचा जोर वाढू लागला आहे. सकाळच्या सुमाराला काही भागांमध्ये केही दाटत आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्याची उपासना करणाऱ्या नागरिकांमध्येही उत्साह आहे. पेठीपासून संरक्षण करण्याबरोबर नवीन फॅशनेबल कपडे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. तरुणांसाठी सुपर ड्राप, रिदम, विंटर जॅकेट, चेक्सस्वेटर, पॅकिट वेटर, दुचाकी चालवताना वापरले जाणारे बापकर स्वेटर इत्यादी उपलब्ध आहेत.
काळ्या, पांढऱ्या आणि खाकी रंगातील हे उबदार कपडे तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत. स्वेटर जॅकेटबरोबरच महिलांसाठी नक्षीकाम केलेल्या शांत, हातमोजे, मफलर, कानटोपी, कानपट्टी, सॉक्ससह कतरिना, हिल्स, कॉतर तेडीज स्वेटर, व्ही नेक या कपड्यांना चांगली मागणी आहे.
Comments
Post a Comment