रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी : शहरातील खालची आळी येथील प्रोढाने अर्धवट स्थितीतील बांधकामाच्या शिगेला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.
जितेंद्र तुकाराम खाके (वय ५०, रा. खालची आळी, रजागिरी) असे त्याचे नाव असून ही घटना दुपारी तीनच्या सुमारास निदर्शनास आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत खाके यांना मद्याचे व्यसन होते. ते गवंडी काम करत होते. मागील दोन दिवस बेपत्ता होते. मात्र त्या बद्दल शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती. खालची आळी येथील लघु उद्योग वसाहत येथीत रान वाढलेल्या ठिकाणी राजेंद्र रामचंद्र खापे यांच घराच्या अपुर्ण बांधकामाच्या शिगेता जितेंद्र खाके यांनी नायलॉनची जाडी दोरी बांधुन पायाखाली दगड ठेऊन गळफास घेतला. या प्रकरणी राजेंद्र खापे यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असून मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती.
Comments
Post a Comment