“मी मरेपर्यंत शिवसैनिकच, कुठेही जाणार नाही!”, या नेत्याने ठाकरेंना आश्वस्त केलं

  

मी मरेपर्यंत शिवसैनिकच, कुठेही जाणार नाही!, या नेत्याने ठाकरेंना आश्वस्त केलं

 

शिवसेना ठाकरेगटाच्या एका नेत्याने मरेपर्यंत शिवसेनेत राहण्याचा उद्धव ठाकरेंना शब्द दिलाय.

मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एक एक करत आमदार खासदार शिंदेगटाच्या बंडात सामील झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष (Shivsena), धनुष्यबाण चिन्ह यावरून झालेला वाद अवघा महाराष्ट्र जाणतो. ठाकरेंच्या शिवसेनेत अस्थिर वातावरण आहे. आणखी काही नेते ठाकरेंना सोडून शिंदेगटात सामील होण्याची चर्चा आहे. अशातच शिवसेना ठाकरेगटाच्या एका नेत्याने मरेपर्यंत शिवसेनेत राहण्याचा शब्द दिलाय.

शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन साळवी यांनी कायम शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला आहे. माझी निष्ठा कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशीच आहे.मी मरेपर्यंत शिवसैनिक म्हणूनच आहे. कुठंही जाणार नाही, असं राजन साळवी म्हणालेत.

 

Comments