भाजपतर्फे रत्नागिरीत छटपूजा

 

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकेशजी गुप्ता यांनी रविवारी रत्नागिरीत भाट्ये समुद्रकिनारी झरीविनायक मंदिराशेजारी छट पूजेचे आयोजन केले होते.

उत्तर भारतीय लोकांचा छट पूजा हा हा पवित्र उत्सव मानला जातो. उत्तर भारतीय लोक देशातील कोणत्याही शहरात वास्तव्यास असले, तरी ते तेथे मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव करतात. रविवारी रत्नागिरीत मुकेश गुप्ता यांनी आयोजित केलेल्या छट पूजेला भाजपचे नेते माजी आमदार बाळासाहेब माने, सौ. माधवी माने आणि इतर उत्तर भारतीय बांधव उपस्थित होते.

Comments