एक कोटीचे कर्ज फेडूनही सावकाराचा त्रास; चिठ्ठी लिहून बांधकाम व्यावसायिक बेपत्ता
![]()
Aurangabad News : शहरातील एक बांधकाम व्यावसायिक सावकाराच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी घर सोडण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली आहे त्यात सहा जणांची नावे असल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध बिल्डर आणि क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल माधवराव अग्रहारकर (वय ५५) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा शहरातील एक बांधकाम व्यावसायिक सावकाराच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी घर सोडण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली आहे त्यात सहा जणांची नावे असल्याचे समोर आले आहे. नंदकिशोर रामराव नांदेडकर (वय ४९) (रा.सातारा परिसर, औरंगाबाद) असे बेपत्ता व्यावसायिकाचे नाव आहे.
मोबाईल चुकीने राहिला असेल म्हणून घरच्यांनी देखील लक्ष दिलं नाही. मात्र, ते रात्री घरी न आल्याने परिवार चिंतेत होता. अखेर त्यांच्या खोलीची पाहणी केली असता तेथे एक चिट्ठी घरच्यांना आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये सहा जणांची नावे आहेत, मात्र ती नावे कुणाची आहेत हे उघड होऊ शकले नाही. सुमारे १ कोटी रुपये कर्जाची परतफेड नांदेडकर यांनी सावकारांना केली होती. तरी देखील सावकाराचा त्रास देणं चालूच होतं, त्या जाचाला कंटाळून नांदेडकर यांनी घर सोडले.
सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल नसून सातारा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस नातेवाईक, मित्र परिवार, रेल्वेस्थानक, इत्यादी ठिकाणी नांदेडकर यांचा शोध घेत आहेत.
Comments
Post a Comment