संजीवन प्रतिष्ठान तर्फे छोटे किल्लेदार स्पर्धेचे आयोजन

 

 

रत्नागिरी : दीपावलीच्या निमित्ताने लहान मुलांमध्ये इतिहासाची ओळख व्हावी, गड किल्ल्याची माहिती व्हावी व आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संजीवन प्रतिष्ठान मार्फत 'छोटे किल्लेदार स्पर्धा 2022' चे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या वर्षीचे वर्ष 4 थे असून या वर्षी देखील ज्या मुलांना या स्पर्धे मध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे दिनांक 23/10/22 पर्यंत श्री दादा दळी, प्रसाद बेर्डे, अण्णा गांगण, मया खाके, विनायक पवार, गुरूदास गोविलकर, रुपेश शिंदे, गोरव शिंदे यांच्याकडे द्यावीत.

 

दीपावलीच्या दिवशी सर्व स्पर्धकांचे त्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचे परीक्षण करून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेत वयोगट 8 ते 18 वर्षाखालील मुळे सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 3 स्पर्धकांना रोख बक्षीस व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल तर सर्व सभाग घेणाऱ्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.

Comments