राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाची हजेरी; अनेक ठिकाणी यलो अलर्ट
![]()
Weather Forecast : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र, मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसाने झालं आहे.
लातूरमध्ये पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. रात्रभर घरात घुसलेले गटारीचे पाणी उपसण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. घराला गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुलांचे दप्तर भिजले, स्वयंपाक घरातील अन्नधान्य, सामान सगळचं पाण्याखाली गेल्याचं नागरिक म्हणाले. पालिकेला गाऱ्हाणं मांडून वैतागले असल्याचं नागरिकांनी म्हटलं. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे गटारी तुंबण्याचं प्रमाण कमी होत नसल्याचं नागरिकांच म्हणण आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लातूर शहरात झालेल्या पावसाने काही शहरातील काही भागाला मोठा तडाका दिला. कित्येक दिवसांपासून तुंबलेल्या गटारी सायंकाळी या पडलेल्या पावसामुळे तुडुंब भरून रस्त्यावर वाहू लागल्य. तर काही घरांमध्येही शिरल्या. बाभाळगाव रोडवर असणाऱ्या म्हाडा कॉलनीत त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
Comments
Post a Comment