विनापरवाना लॉटरी प्रकरणी वैभव खेडेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

रत्नागिरी : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान विनापरवाना लॉटरीची सोडत काढून विजेत्यांना बक्षिस वाटल्यापारकरणी मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी खेड पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वैभव खेडेकर यांना अटक करण्याची तयारी केली आहे. बुधवार रात्रीपासून पोलीस वैभव खेडेकर यांचा शोध घेत आहेत यासाठी पोलिसांनी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
राजवैभव प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी खेड शहरात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. या उत्सवांदरम्यान भाविकांमध्ये लॉटरीची तिकीटे वाटून नशीबवान भाविकाला वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. यामध्ये मोटारसायकल, फ्रिज, ओव्हन, प्रेमसुरे कुकर, अशा प्रकारच्या बक्षिसांचा समावेश असतो. करोनाची मागील दोन वर्षे वागतलेली तर हा उपक्रम सुरु आहे.
Comments
Post a Comment