खेड: 'मनसे'च्या तीन कार्यकर्त्यांची जामिनावर

खेड : गणेशोत्सवाच्या कालावधीत धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर लॉटरी तिकिटे काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केदार वणजू, प्रसाद शेट्ये, दादू नांदगावकर या तिघांची तीन दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
गणेशोत्सवात विनापरवाना लॉटरी काढल्याप्रकरणी मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वैभव खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Comments
Post a Comment