राजन साळवी घेणार आज उद्धव ठाकरेंची भेट, भेटीमध्ये नेमकी चर्चा कशावर?

 राजन साळवी घेणार आज उद्धव ठाकरेंची भेट, भेटीमध्ये नेमकी चर्चा कशावर?

राजकीय वर्तृळातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे आज उद्धव  ठाकरेंची भेट घेणार आहेत.

मुंबई  : राजकीय वर्तृळातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) हे आज उद्धव  ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. सोमवारी राज्यातील विविध ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठं यश मिळालं आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्या या भेटीदरम्यान इतर देखील काही विषयांवर चर्चा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रत्नागिरीत ठाकरे गटाला यश

सोमवारी राज्यातील विविध ग्रामपंचायतींचे निकाल लागले. यामध्ये ठाकरे गटाला चांगले यश मिळाले आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. हा शिंदे गट आणि मंत्री उदय सामंत यांच्यासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. ठाकरे गटाने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशानंतर आता राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत.

 

Comments