अनिल परब यांचे रिसॉर्ट लवकरच पाडणार, १४ नोव्हेंबर रोजी उघडणार निविदा

रत्नागिरी : माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याविरोधात त्यांनी न्यायालयीन लढाई लढली होती. मात्र, हे रिसॉर्ट आपले नाही, असे अनिल परब यांनी वारंवार सांगितले आहे.
सोमय्या यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे. चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रात साई रिसॉर्ट पाठण्यासाठी जाहिरात दिली आहे. कंत्राटदारांना १० नोव्हेंबरपर्यंत निविदा भरण्याचे आवाहन केले आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचे काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment