मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, ठाण्याकडे जाणारा 'हा' मार्ग ४ दिवस बंद; वाचा पर्यायी मार्ग
![]()
Mumbai To Thane route : मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, पुढचे ४ दिवस ठाण्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांसाठी काय पर्यायी मार्ग आहेत, जाणून घेऊयात...
मुंबई : मुंबईकरांसाठी आणि ठाणेकरांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही मुंबईहून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत असाल तर तुम्हाला पुढचे चार दिवस अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईहून ठाण्याकडे जाणारा मार्ग पुढचे ४ दिवस बंद असणार आहे. ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी मॉल, वाघबीळ ब्रिज, घोडबंदर रोड या ठिकाणी गरड टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकी बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यामुळे नागरिकांनी मुंबईहून ठाण्याकडे प्रवास करताना पर्यायी मार्गाने प्रवास करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामामुळे वाहतुकीवरती मोठा परिणाम होणार असून याबाबतची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment