संगमेश्वरात एकाच रात्री तीन मंदिरे व एक घर फोडले

 Crime in India: What explains the four-month delay in the release of the  national crime report?

रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री तीन मंदिरे व एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सगमेश्वर पोलिसांची झोप उडवली आहे.

ऐन दिवाळीत जिल्यात चोरटे पुन्हाएकदा सक्रिय झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील 3 मंदिरातील दानपेट्या फोडून नावडी परिसरातील एका घरातून लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. संगमेश्वर तालुक्यातील श्री वरदायनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून गाभाऱ्यात देवीसमोर असलेली स्टीलची दानपेटी फोडून चोरट्यानी दानपेटीतील रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यानी सरंद गुरव वाडीतील वाघजाई मंदिराकडे मोर्चा वळवला व वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून चोरटे माखजन धामापूर गुरववाडीतील श्री नवसरी ग्राम देवीच्या मंदिरात पोहचले आणि त्याठिकाणी देखील गाभाऱ्यातील दान पेटी फोडून रोख रक्कम लंपास केली.

संगमेश्वर तालुक्यातील 3 मंदिरातील दान पेट्यांवर डल्ला मारून चोरट्यांची पावले नावडी परिसराकडे वळली. नावडी येथील वैशाली संजय रहाटे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

या प्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. एकाचवेळी ४ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने संगमेश्वर पोलिसांची झोप उडाली आहे.

Comments