कारवांचीवाडीत घरफोडी; ३० हजारांचा ऐवज

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज त लांबवला.
ही घटना शुक्रवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६.४५ वा. या दरम्यान पडली. याबाबत केन नांदगावकर (वय ३१, रा. कारवांची वाडी, रजागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळी केतन नांदगावकर काही कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते सायंकाळी ते घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजा कही कोयंडा उचकटलेल्या अवस्थेत दिसून आला. नांदगावकर यांनी घरात जाऊन पाहिले सामान असता त्यांना बेडरूममधील बेडरूममधील अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच कपाटातील सोन्याची ACअंगठी, चांदीचा उत्ता, रोख ५ हजार रुपये असा एकूण २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमात चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, अधिक तपास पोलिस हवालदार भितळे करत आहेत.
Comments
Post a Comment