साहिल मोरेच्या आत्महत्या प्रकरणी सहकाऱ्यांची चौकशी

रत्नागिरी : शहरानजिकच्या एमआयडीसी येथील साईभूमी नगरातील इमारतीमध्ये शुक्रवारी सकाळी साहिल विनायक मोरे या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येच्या कारणावरुन अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
प्रेयसीसोबत बोलत असताना दोघेही घरातून बाहेर जाणार होते. मग प्रेपसी त्याला रुमध्ये सोडून बिल्डिंगव्याखाली का आती? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसांनी साहितच्या आमहत्येला जबाबदार कोण याचा शोध सुरु केला आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
शहरानजिकच्या अलावा येथीत साहिल मोरे या तरुणाने प्रेयसीने नकार दिल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र काहि मिनिटांपूर्वी आलेल्या साहितने तात्काळ आत्महत्येचा निर्णय कसा काय घेतला? शेवटच्या पंधरा मिनिटात असे नेमके काय झाले कि त्यामुळे साहिलता आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला याचा शोध सुरु करण्यात आता आहे. साहिलने ज्या पट्ट्याने आत्महत्या केली. तो पट्टा नेमका कोणी आणला होता. याचा शोध सुरु करण्यात आला आहे. तर दुसऱ्याचा फ्लॅट असताना त्याची प्रेयसी साहिलता एकट्याला सोडून कशी काय गेली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Comments
Post a Comment