आगरनरळ येथे एसटीची रिक्षाला धडक

 Centre mulling over establishing National Road Safety Board; integrated accident database to be extended to all States - Articles

रत्नागिरी : आगरनरळ येथे एसटीची रिक्षाला धडक बसून अपघात झाला. यात रिक्षातील 6 जण जखमी झाले असून ही घटना गुरुवारी दुपारी 11.55 वा. घडली. सुनील जोगदंड असे जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात महेंद्र पांडुरंग ठोंबरे (वय 38, रा. आगरनरळ, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी ते आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-ई-7837) मधून आपल्या कुटुंबाला घेऊन खंडाळा ते आगरनरळ जात होते. त्याचवेळी सुनील जोगदंड आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-0013) घेऊन देऊडमार्गे जाकादेवी ते आगारनरळ असा भरधाव वेगाने जात होता. एसटी अतिवेगाने जात असल्याचे पाहून ठोंबरे यांनी आपली रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला कच्च्या साईड पट्टीवर घेतली. परंतु सुनीलचा एसटीवरील ताबा सुटला. त्याने एसटी डाव्या बाजूला घेतल्याने डोंगराला धडक बसून एसटी तिरकी झाल्याने तिच्या मागील बाजूची धडक रिक्षाला बसली त्यामुळे रिक्षा पलटी झाली.

Comments