माझ्या लेकीची काळजी घे...; केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातातील पायलटचे ते शब्द ठरले अखेरचे

 helicopter-crash

 

Helicopter Crash In Kedarnath: केदारनाथमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गौरीकुंड येथे हा अपघात घडला असून आर्यन या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते.

 
रुद्रप्रयागः माझ्या मुलीची काळजी घे, हे अखेरचे शब्द आहेत ते म्हणजे केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील पायलटचे. अनिल सिंह असं त्याचं नाव आहे. मंगळवारी केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळले असून त्यात सहा भाविकांसह हेलिकॉप्टरच्या पायलटचा मृत्यू झाला आहे. खराब दृश्यमानता आणि दाट धुके यामुळं हा अपघात घडला आहे.
 
अनिल सिंह हे मुंबईचे असून अंधेरीत ते आपल्या कुटुंबासमवेत राहतात. पत्नी शिरीन आणि मुलगी फिरोजा सिंह त्यांच्या कुटुंबात आहेत. अपघाताची माहिती मिळताच शिरीन या दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. अनंत यांचे अपघाताच्या आदल्या दिवशीच पत्नी व मुलीसोबत बोलणं झालं होतं. त्यानंतर त्यांच्या निधनाची खबर येताच कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
 
अनिल यांचा मुलीवर फार जीव होता. तिची तब्येत ठिक नसल्याने ते सतत फोनवरुन तिच्या तब्येतीविषयी चौकशी करत होते. अपघाताच्या आधीही त्यांनी पत्नीला फोन करुन मुलीच्या तब्येतीची चौकशी केली तसंत, तिला माझ्या मुलीची काळजी घे, असंहे ते सांगायला विसरले नाही. अनिल यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
 
दाट धुके आणि कमी दृष्यमानता यामुळं हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हेलिपॅडवरून उड्डाण घेताच पाच ते दहा सेकंदातच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. दुर्घटनेत हेलिकॉप्टरचा वैमानिकाचाही मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन या खासगी कंपनीचे होते. केदारनाथ मंदिरावरुन गुप्तकाशी या ठिकाणी जाण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं मात्र उड्डाण घेताच गरुडचट्टी येथील देव दर्शनी येथे अपघात झाला.

Comments