'चतुरंग'ची दिवाळी पहाट मैफल ३० ऑक्टोबरला'

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठानची यावर्षीची दिवाळी पहाट मैफल येत्या रविवारी (दि. ३० ऑक्टोबर) वहाळ (ता. चिपळूण) येथे होणार आहे.
आपल्या विविध सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांतून अनेक नामवंत कलाकारांना कोकणासारख्या दुर्गम आठमा भागात आणण्याचे आणि त्यांच्या कलाविष्कारांचा आस्वाद कोकणातील रसिकांना मिळवून देण्याचे श्रेय नि:संदिग्धपणे चतुरंग प्रतिष्ठानला यावे लागेल. गेल्या २५ वर्षांत 'कतारांच्या', 'आस्वादयात्रा', 'मुक्तसंच्या', 'दिवाळी पहाट' यांसारख्या लक्षवेधी उपक्रमांद्वारे चिपळूण, रत्नागिरी, गोव्यामध्ये हजेरी लावलेल्या कलाकारांची संख्या दोन अडीचशेपेक्षा अधिक आहे. करोनाचा अंधार ओसरल्यावर यावर्षीची दिवाळी पहाट मैफल चिपळूण तालुक्यातील वहाळ या निसर्गरम्य गावात होत आहे. दिवाळी पहाट या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची मूळ संकल्पना चतुरंग प्रतिष्ठानची स्वत: ची असून चतुरंगने १९८६ साली मुंबईत सर्वप्रथम ती अमलात आणली. विशेष म्हणजे गेल्या ३६ वर्षांत मुंबई-ठाणे- पुणे विपण वहाळ गुणदे रजागिरी गोवा असा प्रवास करत करत गतवर्षी सुवर्णमहोत्सवी दिवाळी पहाट साकारली. ही अफलातून संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना प्रतिवर्षी आकाशकंदीत, रांगोळ्या, पणत्या, सुगंधी स्वागत, एखाया संस्थेता भाऊबीजभेट, सर्व रसिकांना फराळ आणि संगीत मैफल या आपल्या सप्तवेशिष्ट्यांनिशीच ५० दिवाळी पहाट मैफली साकार करून सर्वदूर महाराष्ट्राला सांगीतिक मेजवानीच दिली आहे.
यावर्षी चतुरंगने जाणीवपूर्वक कोकणातील लोकप्रिय कलाकारांना प्राधान्य दिले असून वहाळमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सूर प्रभाती, रंगती.. या मैफलीत कोकणातील रसिकमान्य गायक अजिक्य पोंक्षे आणि सौ. श्वेता तांबे-जोगळेकर यांच्या नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग अशा संमिश्र सुश्राव्य जोगापनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या मैफलीला तबलासाथ हेरंब जोगळेकर, ऑर्गनसाथ चि. श्रीरंग जोगळेकर आणि हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन हे कलाकार करणार आहेत. निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्ग या पालक विद्यार्थीप्रिय अशा शैक्षणिक उपक्रमात यंदा एक विशेष भाग म्हणून रंगणारी ही जुगलबंदी मेफल ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.१५ वाजता न्यू स्कूल (वहाळ) येथील सभागृहात पार पडणार आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असलेल्या या मैफिलीचा लाभ उत्सुक रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन चतुरंगने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment