खंडाळा सैतवडे येथे सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा वावर, वाहनचालकांमध्ये भीती

 Cheetah | Smithsonian's National Zoo

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा सैतवडे येथे सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे वावर असल्याने वाहन चालकासह पादचारी भयभित झाले आहेत.

गेले काही दिवस खंडाळा सेतवडे रस्त्यावरती बिबट्याचे दर्शन होत आहे. दुचाकी, रिक्षा, पादचारी यांची सतत ये-जा या मार्गावरून असते. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण आहे.

शुक्रवार 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गावातील एका वाहन चालकाला पन्हली फाटा बिबट्या दिसून आला. बिबट्याला पाहताच त्याची भंबेरी उडाली. मात्र बिबट्याने रस्ता क्रॉस केल्यानंतर त्याने पुढचा मार्ग धरला. बिबट्याच्या सततच्या या वावरमुळे नागरिकांत ही भीतीचे वातातरण आहे. बिबट्याच्या बंदोबस्त करून दहशतीखाली असलेल्या ग्रामस्थांना भीतीच्या छायेतून मुक्त करावे अशी मागणी होत आहे.

Comments