धक्कादायक! पाणी समजून महिलेने प्यायलं सॅनिटायझर, पुढे जे घडलं ते वाचून काळजाचा ठोका चुकेल...
Ratnagiri News Today : रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका महिलेने पाण्याच्या जागी सॅनिटायझर प्यायल्याने तिला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा इथे पाणी समजून महिलेने असं काही प्यायली की एका नेपाळी विवाहितेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी रत्नागिरी पोलीसांनी दिली.
तुलसीदास पदम लामा ( २७, मुळ रा. नेपाळ सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा पती पदम राम बहाद्दूर लामा (२६, मुळ रा. नेपाळ सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) याने जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानूसार, मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. तुलसीदास हिने राहत्या घरी पाणी समजून सॅनिटायझरचे प्राशन केले
Comments
Post a Comment