रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

तांजा : कोकण रेल्वे मार्गावर गाडीतून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आजणारी बोगद्यानजीक घडली. या तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंजणारी बोगद्यानजीक रुळाच्या बाजूला या तरुणाचा मृतदेह आढळला. रेल्वे गाडीतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची खबर आंजणारी गावाच्या पोलीस पाटील श्रद्धा सरपोतदार यांनी लांजा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लांजा पोलिसांकडून करण्यात आले आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment