मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला… वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्द

 मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला... वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्द

मी त्याला शिक्षा देऊ शकते. पण कायदा आणि परमेश्वर त्याला अधिक चांगली शिक्षा देईल याची मला आशा आहे. या सर्व प्रकारात मला माझ्या आईवडिलांना अधिक त्रस्त होताना पाहायचे नाहीये.

इंदौर: अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) आत्महत्या प्रकरणाचे एकामागून एक रहस्य उलगडू लागले आहे. या धक्कादायक खुलाशामुळे सर्वच हैराण झाले आहेत. दुसरीकडे हे खुलासे तिच्या चाहत्यांना भावनिकही करत आहेत. वैशालीच्या आत्महत्येनंतर तिच्या घराबाहेर सुसाइड नोट सापडली होती. शेजारी राहत असलेला राहुल हा तिच्या आत्महत्येला (suicide) जबाबदार असल्याचं त्यात म्हटलं आहे. पोलिसांनी ही सुसाइड नोट मिळताच राहुल आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. या सुसाइड नोटची (suicide note) काही पानं व्हायरलही झाली आहेत. त्यात वैशालीने तिचं दु:ख सांगितलं आहे. तिचे हे शब्द काळजाला चिर पाडणारे असेच आहेत.

आता तू कुणाशी भांडणार आहेस? मी तर त्याचा स्वीकार केला होता. त्याने तर मला परकं समजलं. शेवटी मितेश सोबतच्या नात्यामुळे मी आनंदी झाले होते. पण त्याने तेही तोडले. मी खूप थकलेय. आता मला काहीच नकोय. राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलंय. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणारच, असं वैशालीने या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.

मी त्याची पत्नी दिशाचं नावही घेईल. नवऱ्याचं वास्तव माहीत असूनही सर्वांसमोर ती मला चुकीचं ठरवत असते. कारण तिला तिचा संसार टिकवायचा होता. आपलं काहीच नुकसान झालं नाही, असं वाटल्याने राहुलने त्याचा फायदा उचलला. पण माझं आयुष्य तर बर्बाद झालं, असं ती या चिठ्ठीत पुढे म्हणते.

मी त्याला शिक्षा देऊ शकते. पण कायदा आणि परमेश्वर त्याला अधिक चांगली शिक्षा देईल याची मला आशा आहे. या सर्व प्रकारात मला माझ्या आईवडिलांना अधिक त्रस्त होताना पाहायचे नाहीये, असं ती म्हणते. तिच्या या शेवटच्या शब्दातून तिच्या मनातील वेदना स्पष्टपणे दिसून येतात.

 

टिप्पण्या

news.mangocity.org