ट्रक अडवून चालकाला बेदम मारहाण करत अपहरण; दरोडेखोरांचा कोट्यवधींच्या सिगारेटवर डल्ला
![]()
Crime News : या घटनेत सशस्त्र दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकमधून तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांची सिगारेट लुटली. सहा अज्ञात दरोडेखोरांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण करुन त्याचं अपहरण केलं.
पालघर : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी ट्रक व त्यातील सिगरेट असा १ कोटी ३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पळवला आहे. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस लुटारुंचा शोध घेत आहेत.
या घटनेत सशस्त्र दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकमधून १.३६ कोटी रुपयांची सिगारेट लुटली. मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितलं की, सहा अज्ञात दरोडेखोरांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण करुन त्याचं अपहरण केलं. यानंतर ट्रक दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यातील सिगारेट काढून घेतल्या. हा ट्रक नवी मुंबईतील रबाळे येथून जयपूरच्या दिशेने जात होता.
दरोडेखोरांनी ट्रक चालकालाही चारोटी टोलनाक्याजवळ सोडलं आणि पळ काढला. या प्रकरणी वसई - विरारच्या मांडवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरु असल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या घटनेत एकून ६ अज्ञात दरोडेखोरांचा समावेश असल्याचं समोर येत आहे.
Comments
Post a Comment