5 हजार कंत्राटी एसटी चालकांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय!

कंत्राटी एसटी चालकांच्या नियुक्तीबाबतचा नेमका निर्णय काय? त्याने फायदा कुणाचा आणि फटका कुणाला?
असमतोल मनुष्यबळ
एसटी महामंडळाच्या अनेक आगारात असमतोल मनुष्यबळ आहे. अनेकदा एसटी डेपोमध्ये गाड्या असूनही चालक नाही, अशी स्थिती होते. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात. यासाठी चालकांची कंत्राटी चालकांची भरती करण्यासाठीची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या होत्या. संप काळात भरण्यात आलेल्या काही चालकांची संख्या कमी करण्यात आली होती. तर काहींना मुदत वाढवण्यात देण्यात आली होती.
इच्छुकांना फटका
दरम्यान, याआधी भरती प्रक्रियेत निवड झालेल्या काही उमेदवारांचं प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आलं होतं. मात्र त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या उमेदवारांकडून अनेकदा विचारणाही करण्यात येत होती.मात्र कोरोना महामारी आणि एसटीचा संपाचा या संपूर्ण भरती प्रक्रियेला फटका बसला होता. ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
Comments
Post a Comment