रत्नागिरी आकाशवाणीचे संगीतकार अवधूत बाम यांचा अभंगवणीचा नजराणा 3 नोव्हेंबर पासून कलावैभव यू ट्यूब चॅनलवर

 

 

रत्नागिरी : रत्नागिरी आकाशवाणीचे मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगवणीचा नजराणा 3 नोव्हेंबर पासून कलावैभव यू ट्यूब चॅनलवर रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

अभंगरचना विविध रोगांमध्ये गुंफत सुमधुर चालीत त्या बांधणं ही अवधूत बाम यांची खासियत सावळे सुंदर रूप मनोहर या विठ्ठल गीतांच्या अभंगवणीतून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. कलावैभव संस्थेतर्फे कार्तिकी एकादशीच्या निमिताने सुरेल भेट विठ्ठल भक्तांसाठी सादर होणार आहे.

प्रसिद्ध गायक प्रसाद शेवडे, मुग्धा भट सामंत आणि स्वप्नील गोरे यांच्या सुमधूर स्वरात असून या सर्व गीतांना तबला साथ गिरीधर कुलकर्णी, पखवाज साथ अभिषेक भालेकर, ताल रक्षक हरेश केळकर, ऑर्गन साथ के मधुसूदन लेले यांची असून सिंथेसायझर साथ राजन किल्लेकर यांची आहे. विशेष सहाय्य नितीन वराडकर व प्रसन्न दाते यांचे असून संगीत मार्गदर्शन प्रसाद गुळवणी यांचे आहे.

संत परंपरेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने हे सादरीकरण होणार असून जास्तीतजास्त संगीत रसिकांनी कलावैभव पू ट्यूब चॅनलवर ह्या गीतांना पसंती यावी, असे आवाहन संगीतकार अवधूत बाम यांनी केले आहे.

Comments