खेड नगर परिषदेकडून 3 दुकानदारांकडून 11 किलो प्लास्टिक जप्त
\
खेड : पर्यावरणाच्या -हासाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टिकने कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी खेड नगरपालिका प्रशासनाने पावलं उचलायला सुरवात केली आहे. शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदी विरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
खेड नगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करत तीन दुकानदारानाकडून 11 किलो प्लास्टिक जप्त केले. या तिन्ही दुकानदारांकडून प्रत्येकी 5000 प्रमाणे 15000 रुपयांचा दंड वसूल केला.
सिंगल यूज प्लास्टिकला शासनाने बंदी घातलेली असताना शहरातील काही आस्थापने प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करत असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या प्लास्टिक विरोधी पथकांच्या निदर्शनाला आले होते त्यानुसार नगरपालिका प्रशासनाच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहरातील 34 दुकानांवर अचानक घड टाकन दुकानाची तपासणी केली. या तपासणी दरम्यान दोन स्वीट मार्ट आणि अन्य एका दुकानात 11 किलो प्लास्टिक आढळून आले. नगरपालिका प्रशासनाने हे प्लास्टिक जप्त करून दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.
ही कारवाई मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चिपळूण अधिकारी, सुशीलकुमार शिंदे नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, कर व प्रशासकीय सेवा प्रमुख अभिजीत पाटील, वसूली विभाग प्रमुख गंगाधर गायकवाड राजेंद्र तांबे, सुबोध जाधव मनोज म्हातले यांच्या पथकाने केले. नागरपालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे प्लास्टिकच्या कॅरी बॅग वापरणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा