रत्नागिरी 14 वर्षाखालील मुलांची क्रिकेट निवड चाचणी 29 ऑक्टोबर रोजी
![]()
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी शनिवार व रविवार दिनांक 29/10/2022 व 30/10/2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहे.
तरी इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणी साठी सकाळी 10.00 वा. हजर रहावे. सोबत स्वतः चे क्रिकेट साहित्य, क्रिकेट गणवेश, आधार कार्ड झेरॉक्स, जन्म दाखला झेरॉक्स, व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे बंधनकारक आहे. निवल चाचणी फी दोनशे रुपये राहील. ज्या मुलांचा जन्म 1/9/2008 नंतर झाला असेल अश्या मुलांना या निवड चाचणीत भाग घेता येतील.
तरी जास्तीत जास्त या निवड चाचणीला मुलांनी सहभाग घ्यावा, असे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असो. अध्यक्ष किरण सामंत, सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी व सर्व पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment