अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:

रत्नागिरी तालुक्यातील तिवराट येथे इर्टिगा गाडीला समोरून धडक देत अपघात केला. याप्रकरणी अज्ञात एक्सयूव्ही चालकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार दि. १६ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या बाबत सुनील प्रवीण उकार्डे (३२, रा. तारापार्क माळनाका, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार गुरुवारी रात्री ते आपल्या ताब्यातील इर्टिगा (एमएच ०८-एफ-०४७८) घेऊन गुहागर ते रत्नागिरी असे भातगावमार्गे येत होते. ते तिवराट येथील वळणावर आले असता समोरुन येणाऱ्या (एमएच ०९- एफजे १-००३७) एक्सयूव्ही गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात झाल्यानंतर चालकाने गाडीसह पळ काढला. या बाबत अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार जोशी करत आहेत.


Comments