रत्नागिरी जिल्ह्यातील 31 अप्रशिक्षित शिक्षकांना मिळणार पेंशन
रत्नागिरी जिल्ह्यातील 31 अप्रशिक्षित शिक्षकांना पेंशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्यकारी अधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांनी हा निर्णय घेतला आहे. 1 जुलै 1972 नंतर सेवेत नियुक्त झालेल्या 31 अप्रशिक्षित शिक्षकांना आता पेंशन मिळणार आहे. सदर शिक्षकांचे डी.एड. न झाल्यामुळे त्यांची पेंशन, वेतनवाढ रोखण्यात आली होती. अशा सर्व शिक्षकांना पेंशन सुरु करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले होते. काही शिक्षक मयतही झाले. अशा शिक्षकांना ते हयात असे पर्यंत आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मुलांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्याबाबत सुचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी याबाबत सविस्तर माहीती गोळा करुन, कागदपत्रे जमवून या 31 अप्रशिक्षीत शिक्षकांना पेंशन सुरु करुन देण्याबाबतचा निर्णय घेतला. आता या सर्व शिक्षकांना पेंशन मिळणार आहे.
Comments
Post a Comment