रत्नागिरीचे कुमार शेट्ये यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट

रत्नागिरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत रत्नागिरीतील पक्ष कार्यासंदर्भात, येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात, तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील शासकीय व अशासकीय कमिट्यांची पदे भरण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन पक्षसंघटनेसंदर्भात चर्चा केली. 

Comments