रत्नागिरीतील मिरजोळे भाटकरवाडी येथे आढळून आला अनोळखी इसमाचा मृतदेह
रत्नागिरीतील मिरजोळे भाटकरवाडी येथे सुमारे चाळीस वर्षिय पुरुष इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. सदर इसमाला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी एका ग्रामस्थाला एका बागेनजिक हा मृतदेह दिसून आला. नंतर बागमालक तुषार शंकर भाटकर याना घटनास्थळी बोलावण्यात आले. तुषार शंकर भाटकर यान्नी पोलिसाना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सदर अनोळखी इसमाचे मृत्युचे कारण समजू शकलेले नाही. अनोळखी पुरुष इसम वय सुमारे 40, उंची सुमारे 5 फुट 8 इंच, रंग सावळा, केस आणि दाढी वाढलेली, काळ्या रंगाची बारिक चौकडीचा हाफ बरमोडा, पोपटी रंगाचा गोल गळ्याचा हाफ टी शर्ट असे त्याचे वर्णन आहे असे पोलिसानी सांगितले. सदर घटनेचा तपास पी.एस.आय. साळुंखे करित आहेत. घटनास्थळी पोलिस निरिक्षक शिरीष सासने, पी.एस.आय. मक्ता भोसले, भगवान पाटील-सहय्यक पोलिस उप निरिक्षक यांनी भेट दिली. सदर घतनेची खबर तुषार शंकर भाटकर यांनी दिली.
Comments
Post a Comment