रत्नागिरी जिल्ह्यातील विनावापर एमआयडीसीचे भूखंड प्रशासन ताब्यात घेणार!

रत्नागिरी जिल्ह्यातील विनावापर पडून असलेले एमआयडीसीचे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरु आहे. वर्षानूवर्षे भूखंड तसेच विनावापर पडून असल्याकारणाने ते भूखंड परत घेण्यात येणार आहेत. ही कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 
एमआयडीसी अंतर्गत व्यावसायिकांना व्यवसाय करण्याकरिता भूखंड देण्यात आले होते. मात्र काही व्यावसायिकांनी 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला तरी देखील खरेदी केलेल्या भूखंडावर कोणतेही बांधकाम, कोणताही व्यवसाय सुरु केलेला नाही. त्यामुळे असे विनावापर असलेले भूखंड एमआयडीसी ताब्यात घेणार आहे. ताब्यात घेतलेले भूखंड जे जुने उद्योजक आहेत आणि ज्याना आपला उद्योग विस्तार करावयाचा आहे अशाना देण्यात येणार आहेत. 
एमआयडीसीने भूखंड दिल्यानंतर 3 वर्षांच्या आत व्यवसाय सुरु करावयाचा असतो. मात्र अनेकांनी भूखंड घेऊन त्यावर व्यवसाय सुरुच केलेला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाकडून ही कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सदरची माहीती रत्नागिरी एमआयडीसी कार्यालयाकडून मिळाली आहे. 

Comments