नगरसेविका दया चवंडे यांच्या संकल्पनेतून प्रभागातील नालेसफाईची मोहीम

रत्नागिरी शहरातील माजी सभापती व माजी नगरसेविका सौ दया चवंडे व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मधील नालेसफाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील मराठी शाळा क्रमांक ३ ते पाटीलवाडी रस्ता या दरम्यान असलेल्या नाल्याची दुरवस्था झालेली आहे. सदर नाला सहा ठिकाणी फुटलेला आहे. यामुळे गतवर्षी पावसाळ्यात चवंडे वठार ते विलणकरवाडी येथे पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. याची पुनरावृत्ती यावर्षीही होऊ नये यासाठी या हेतूने माजी नगरसेविका व माजी सभापती सौ. दया चवंडे यांच्या संकल्पनेतून व कार्यकर्त्यांच्या वतीने या नाल्याची दुरुस्ती व साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पे चवंडे, राहूल रसाळ यांच्या पाठपुराव्याने सदर मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामामुळे नागरीकांमधून शुभेच्छा व्यक्त होत आहेत. 

Comments