रत्नागिरीतील मिरजोळे येथे आयोजीत साई प्रीती प्रिमीयर लीग भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिअशनच्या मान्यतेने व रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील कबड्डीच्या खेळाडूंना, त्यांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी रत्नागिरीतील मिरजोळे येथे आदिष्टी नगर विमानतळशेजारी प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होते. साईप्रीती प्रीमियर लीगमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला. त्याचा उद्घाटन सोहळा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पाटील, सरपंच गजानन गुरव, उपसरपंच राहुल पवार, ऋतुजा रेवाळे, प्रीती कदम, राम नाखरेकर, दत्ताराम किर, नीलकंठ कदम, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर या स्पर्धेचे आयोजक विजय कदम, गुरुदास कदम, सागर कळंबटे, अरुण पवार, अनिकेत भोळे, सुजित पाटील, प्रशांत कनगुटकर, मयूर कदम आणि साहिल कदम हे आहेत.
Comments
Post a Comment