राजापूर शहरातील जवाहर चौक शिवाजी पथ रोड ते वरची पेठ रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामामुळे अंतर्गत जोड रस्ते झाले बंद, पादचा-यांसह वाहनचालकांना होतोय मनस्ताप, जिल्हा प्रशासन याची दखल घेईल का?
राजापूर शहरातील जवाहर चौक शिवाजी पथ रोड ते वरची पेठ या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले. मात्र यामुळे या रस्त्याला जोडून असलेले आणि मुख्य बाजारपेठेत जाणारे अंतर्गत जोड रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे नागरीकांना आणि दुकानदाराना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काँक्रिटीकरण केल्यामुळे रस्त्याची उंची वाढली. त्यामुळे अंतर्गत जोड रस्ते खोलात गेले. त्यामुळे या अंतर्गत रस्त्यावरुन चालताही येत नाही आणि वाहनही नेता येत नाही. त्यामुळे हे जोड रस्ते सुधारायची जबाबदारी नेमकी कुणी घ्यायची? राजापूर नगर परिषद सदर काँक्रिटीकरण रस्ता कामाच्या ठेकेदाराला काही जबाबदारी देणार का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अतिवृष्टी कार्यक्रम 2020-21 योजनेमधून जवाहर चौक शिवाजी पथ रोड ते वरची पेठ या दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी पहिल्या टप्प्यासाठी सुमारे दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण देखील करण्यात आले. मात्र सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण व्यवसाय होण्याच्या हंगामातच करण्यात आले. यावेळी रस्ते दुकाने हटवावी लागली. अनेकांना नाहक त्रासही करावा लागला. मात्र नागरीकांनी काँक्रिटीकरण कामासाठी सहकार्य केले. मात्र काँक्रिटीकरणाचे काम संपूनही नागरिकांचा मनस्ताप काही संपेनाच. त्यात आता भर म्हणून अंतर्गत जोड रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही कार्यवाही होतेय का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment