भाई शिंदे यांचा निवृत्ती समारंभ थाटात संपन्न

भाई शिंदे यांचा निवृत्ती समारंभ  थाटात संपन्न
--------------------------------------
देवरुख दिनांक 5 ( प्रतिनिधी)
    येथील नजीक असलेल्या लोकविद्यालय तुळसणी चे लिपिक सत्यवान तथा भाई शिंदे यांचा नुकताच निवृत्ती समारंभ थाटात संपन्न झाला .
सविस्तर वृत्त असे की भाई शिंदें यांनी तुळसणी  येथे 34 वर्षं लिपिक या पदावर उत्कृष्ट सेवा बजावली त्यानिमित्ताने संस्था, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . विद्यालयाच्या विकासात भाई शिंदे यांचे मोठे योगदान आहे . सामाजिक राजकीय क्षेत्रात देखिल भाईंचे काम उल्लेखनीय आहे 
     याबबद्दल जिल्ह्यातील अनेक मान्यवर यांनी भाईंचा शाल श्रीफळ देऊन गौरव केला .राजकीय ,सामाजिक ,
शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी भाईंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते . संगमेश्वर चिपळूण मतदार संघाचे आमदार मा.शेखर निकम , माजी जि प अध्यक्ष रोहन बने माजी जि प सदस्या नेहा माने उपस्थित होत्या.
      संस्था परिवारातील संस्थेचे अध्यक्ष सुमित सुर्वे , जयसिंग राव सुर्वे , शर्मिला राजवाडे,गजानन सुर्वे ,श्रीपत मोहिते मुख्याध्यापिका कल्पना धावडे  माजी मुख्याध्यापक मोहन काळे आदी उपस्थित होते .
    माध्यमिक पतपेढीचे सेक्रेटरी प्रमोद पटवर्धन ,ऑडिटर माधव हिर्लेकर चेअरमन बळवंत चोगुले व्हॉईस चेअरमन चव्हाण निलेश कुंभार प्रकाश पांढरे देखील उपस्थित होते
   शिक्षकेतर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटणकर कार्यवाह प्रकाश साळवी ,नंदकुमार आंबेकर तालुका कार्यवाह अमोल लिंगायत आदी उपस्थित होते .
     हा सत्कार केवळ माझा नसून तुमचा सर्वांचा आहे . तुमची प्रेरणा सहकार्य मी कधीच विसरू शकणार नाही मी आपला सदैव कृतदन राहीन अशी भावना भाईंनी व्यक्त केली 
     निटनेटक्या आणि सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी नलावडे यांनी केले .डॉ.राजन शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले

Comments