रत्नागिरीत भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या टप्प्यातील अधिकारी पारिवरिक आवासीकेचे उद्घाटन
आपल्या कर्मचार्यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्याच्या उद्दीष्टपूर्ततेसाठी भारतीय तटरक्षक दलाने दिनांक २० मे २०२२ रोजी पहिल्या टप्प्यातील अधिकारी पारिवरिक आवासीकेचे उद्घाटन कमांडर तटरक्षक क्षेत्रीय मुख्यालय (पश्चिम) यांचे हस्ते केले. या कार्यक्रमादरम्यान निवासिकेच्या चाव्या क्षेत्रीय कमांडर यांनी प्रथम निवासी अधिकार्यांना सुपूर्त केल्या. या प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यामद्धे एकूण १५ सदनीकांचे बांधकाम करून त्यांना हस्तांतरित करण्यात आले. प्रगतीपथावर असलेल्या पुढील टप्प्यांमध्ये २०० पेक्षा अधिक सदनिकांची निर्मिती केली जाणार आहे.
हे पारिवरिक संकुल सैन्य अभियांत्रिकी सेवा यांचेद्वारे ग्रीहा (ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटाट) शिफारशींनुसार आणि ऊर्जा संवर्धन करण्यासंधर्भातील हरितसंकल्पनेनुसार नियोजित करण्यात आलेले आहे. तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
भारतीय तटरक्षक दल हे रत्नागिरी येथे भूपृष्ठीय, सागरी आणि हवाई क्षमतांच्या वृद्धीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करून आपली कार्यक्षमता वाढवीत आहे. नुकतेच एडवांस्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) एमके-१ चे एक स्क्वाड्रन रत्नागिरी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या किनारपट्टीच्या सुरक्षेत वाढ होईल. तसेच तटरक्षक दलाच्या शोध व बचाव, प्रदूषण नियंत्रण इत्यादी कार्यांच्या क्षमतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
प्रगतीपथावरील इतर मुख्य प्रकल्पांमध्ये रत्नागिरी विमातळावरून रात्रीच्या उड्डाणाची सुविधा निर्माण करणे तसेच सुरक्षित आणि सुरळीत संचालनासाठी इतर सेवांची निर्मिती करणे यांचा समावेश आहे. नजीकच्या भविष्यामध्ये कोस्टल रडार स्टेशन नेटवर्कची साखळी वृद्धींगत करणे तसेच रत्नागिरी येथे भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांच्या दुरुस्तीसाठी स्लीपवे आणि ट्रॅवल लिफ्टची निर्मिती करणे हे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.
Comments
Post a Comment