रत्नागिरीतील काळबादेवी खाडीकिनारी मासेमारिसाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू
रत्नागिरीतील काळबादेवी टेंबरेवाडी येथील एका इसमाचा काळबादेवी खाडी किनारी मासेमारी करत असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी घडली. शंकर गंगाराम कांबळे वय 59 असे या इसमाचे नाव आहे. शंकर गंगाराम कांबळे हे मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मासे मारायाचा पाग घेऊन काळबादेवी खाडी किनारी गेले असता तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच पेट्रोलिंग करत असलेले रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उप निरीक्षक एस.के.इंदूलकर घटनास्थळी गेले. मयत शंकर गंगाराम कांबळे यांना पोस्टमार्टेमसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी मयत इसमाचे प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर घटनेचा तपास एस.के.इंदूलकर-सहाय्यक पोलिस उप निरिक्षक करित आहेत. सदर घटनेची माहिती एस.के.इंदूलकर सहाय्यक पोलिस उप निरिक्षक यांनी दिली.
Comments
Post a Comment