संगम मोरे यांनी दखल घेतली

गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पोलिस परेड मैदान येथिल स्वच्छतागृह , दुरुस्त व स्वच्छ करण्यात यावे व पर्यटक व चाकरमानी यांची होणारी गैरसोय होउ नये,यासाठी भारतीय जनता पार्टी गुहागर शहर अध्यक्ष संगम मोरे यांनी  दखल घेतली आणि  नगरपंचायत गुहागरमधे निवेदन देण्यात आले. नगरपंचायत च्या वतिने श्री पेड़ामकर साहेब यानी लवकरात लवकर या गोष्टी ची कार्यवाही करु असे अश्वासन दिले. यावेळी भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक व गटनेते श्री उमेश जी भोसले. स्वी. नगरसेवक श्री संजय मालप, महिला मोर्चा तालुक़ाअध्यक्ष श्रीम. श्रद्धा घाडे ,शहरअध्यक्ष श्री संगम मोरे, युवामोर्चा शहरअध्यक्ष श्री मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष श्री हेमंत बारटक्के , युवामोर्चा शहर सचिव कु. प्रथमेश परांजपे उपस्थित होते🪷

Comments