खासदार विनायक राऊत यांनी रमजान ईद निमीत्त रत्नागिरीतील शिवखोल भागातील मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमीत्त शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील शिवखोल परिसरातील मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवार चर्चा देखील केली. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे माजी सभापती सुहेल मुकादम, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, जिलानी कादरी, पत्रकार शकील गवाणकर, सरफराज मुकादम, परवेज कादरी, असलम गवाणकर, साजिद साई, मौलाना साबिर शेख, बाबालाल कादरी, ईब्राहिम खान, सिराज कादरी, करीम जमादार, मोहसिन खान, राहिल जमादार, रफिक जमादार यांच्यासह या भागातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment