शिवसेनेचे राजापूर तालुक्यातील ओणी येथे शिवसंपर्क अभियान संपन्न

शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे ह्यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली असून आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ राजापूर तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गट दिनांक २८ मे रोजी ओणी गजानन मंगल कार्यालय येथे निरीक्षक प्रितम शिंदे उपाध्यक्ष स्थानिक लोकाधिकार समिती, सिद्धेश शिरगावकर चिटणीस स्थानिक लोकाधिकार समिती ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियाना टप्पा २ चा शुभारंभ करण्यात आला. 
त्याप्रसंगी आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पांडुरंग उपळकर, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर,  विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, राजापुर लांजा साखरपा विधानसभा सम्पर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे,
जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, महिला उपजिल्हा आघाडी दुर्वा तावडे, उपतालुका प्रमुख विश्वानाथ लाड, विभाग प्रमुख वसंत जडयार, तालुका सह सम्पर्क प्रमुख राजाराम नारकर, माजी जिल्हा अर्थ व शिक्षण सभापती शरद लिंगायत, विभागीय संघटक उमेश पराडकर, उपविभाग प्रमुख सुरेश  मासये, दयानंद चौगले, नागेश बने, पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर, अप्पा शिंदे, महिला आघाडी श्रद्धा नडे, मीनल गोरुले, सुनीता राजापकर, युवासेना विभाग अधिकारी सुभाष सुर्वे, युवासेना उपविभाग गौरव सोरप, कीशोर लाड, मुंबई पदाधिकारी, बबन सकपाळ, प्रकाश कानडे, विद्याधर पेडणेकर, सत्यवान कदम व अन्य शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना, ग्राहक संरक्षण कक्ष, शिवसहकार सेना, अन्य अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, सरपंच, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Comments