रत्नागिरीतील कोतवडे बौद्धवाडी येथील विकास कामांचे उद्घाटन

रत्नागिरीतील ग्रुप ग्रामपंचायत कोतवडेच्या वतीने कोतवडे बौद्धवाडी येथील सौर पथदिवे व स्मशानभूमी शेड या विकास कामांचे उदघाटन बुधवार दिनांक 25 मे 2022 रोजी सरपंच तुफील पटेल, उपसरपंच संतोष बारगोडे , ग्रामपंचायत सदस्या सौ दिया कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
               15 वा वित्त आयोग या निधीतून कोतवडे बौद्धवाडी येथे 4 सौर पथदिवे बसविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत फंड 15% निधीतून स्मशानभूमी शेड चे काम करण्यात आले.
या दोन्ही उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बौद्धजन सेवा संघ कोतवडे चे अध्यक्ष रविंद्र कांबळे, मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सेवा निवृत्त पोलीस राजेंद्र कांबळे, सीमा सुरक्षा दल जवान मनोज कांबळे, भीमदास कांबळे, माजी पोलीस पाटील मंगेश कांबळे, महिला अध्यक्षा श्रीमती सुवर्णा जाधव, उपाध्यक्षा सौ रूही कांबळे, सचिव सौ अनुष्का कांबळे, सौ रेश्मा कांबळे, सौ चंचला कांबळे, सौ जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments