राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या प्रयत्नाने व राजरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने राजापूर शहरातील दोन मनोरुग्णांना ताब्यात घेण्यात यश, पुढील उपचारासाठी प्रादेशीक मनोरुग्णालयात केले दाखल, पोलिस कर्मचारिही होते उपस्थित

राजापूर शहरात फिरणा-या 2 मनोरुग्णांना ताब्यात घेऊन रत्नागिरी जिल्हा मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात यश आलय. राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या प्रयत्नाने राजापूरात राजरत्न प्रतिष्ठानची टिम गुरुवारी 26 मे रोजी दाखल झाली. त्यानंतर राजापूर शहरात एक पुरुष व एक महिला मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. हे दोन मनोरुग्ण राजापूर शहरात फिरत होते. याबाबत माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानला कळवले. त्यानंतर राजरत्न प्रतिष्ठानची एक टिम राजापूरात गुरुवारी सकाळी दाखल झाली. आणि पोलिसांच्या उपस्थितीत या मनोरुग्णाना ताब्यात घेण्यात आले. 
यावेळी माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल पुजा चव्हाण, सुषमा स्वामी, राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश सावंत, सभासद जितेंद्र जाधव, अनिरुद्ध खामकर, ऐश्वर्या गावकर, रुग्णवाहिका चालक विनय गाडगीळ आदी उपस्थित होते. 

Comments