कोतवडे धामेळेवाडीत आकरेश्वर मंदिर जीर्णोध्दार निमित्त विविध कार्यकम
तालुक्यातील कोतवडे धामेळेवाडी येथील कुलस्वामी भैरव श्री आकरेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार पूर्ण झाला असून या निमित्त विविध कार्यकमांचे 6 ते 8 मे या दरम्यान विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवार दि. 6 मे रोजी सकाळी 9 वा. देव-देवतांची मिरवणूक, सायंकाळी 7.00 वा. महाआरती. रात्रौ 8 वा. स्थानिक भजन, रात्रौ 9 वा. सांस्कृतिक कार्यक्रम. शनिवार दि. 7 मे रोजी सकाळी 7.00 वा. पासुन पुण्याहवाचन, नवग्रह देवता पूजन, सुवासिनीकडून मूर्तीवर जलाधिवास, धान्याधिवास, वास्तुशांती, संध्याकाळी 7.00 वा. महाआरती, रात्री 8.00 वा. स्थानिक भजन. रविवार दि. 8 मे रोजी सकाळी 7.00 वा. पासुन देव-देवतांचे पूजन, देव-देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापन। पूर्णाहूती, सकाळी 9.00 ते 10.00 वा. करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, कोल्हापूर, यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण सोहळा व आशीर्वाद. दुपारी 1.00 ते 3.00 वा. महाप्रसाद 4. दुपारी 3.00 ते 6.00 महिलांसाठी हळवीपुंकू, सायंकाळी 6.00 वा. मान्यवरांचे स्वागत व आभार, 7.30 वा. महाआरती. रात्रौ 9.00 वा. स्थानिक भजन, रात्री 10.00 वा. श्री ग्रामदेवता लोककला नाटय नमन मंडळ, माभळे, जाधववाडी ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, यांचे बहुरंगी नमन, या कार्यकमांचा मित्र मंडळींसह अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमांचा व तीर्थ-प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री आकरेश्वर सेवा मंडळ, व मंदिर जीर्णोध्दार समितीच्यावतीने निमंत्रक रमेश सोनू मांडवकर (वाडीप्रमुख) समिती यांनी केले.
Comments
Post a Comment