राजापूर जकातनाका ते जवाहर चौक रस्त्याचे डांबरीकरण कधी पूर्ण होणार? विवेक गुरव

राजापूर जकातनाका ते जवाहर चौक रस्ता वाहन चालविण्यासाठी योग्य राहिला नाही. या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील भाजप कार्यकर्ते विवेक गुरव यांनी केली आहे. 
जकातनाका ते जवाहर चौक रस्त्याचे डांबरीकरण नेमके कुणामुळे रखडले आहे? या मार्गावर असंख्य खड्डे पडले आहेत. पावसाच्या तोंडावर पाईपलाईनच्या खोदाईचे काम सुरु केले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस आणखीनच त्रासदायक झाला. रस्त्यावरुन चालताना धूळ उडते. सध्या एका बाजुने खडी टाकून साईडपट्ट्या मारण्याचे काम सुरु असून वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याचा प्रशासनाने गांभिर्याने विचार करावा. सदर रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी विवेक गुरव यांनी केली आहे. 
दैनिक फ्रेश न्युजच्या वतीने विवेक गुरव यांना जकातनाका ते जवाहर चौक रस्त्याच्या डांबरीकरण कामाबाबत प्रतिक्रीया देण्याबाबत विचारणा केली होती. त्या अनुषंगाने विवेक गुरव यांनी सदर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Comments