पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

दि.२०/०५/२०२२ रोजी पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. पोलीसांचा दिवसातील कर्तव्य कालावधी हा जास्त असल्याने कर्तव्यात अनेक वेळा तणावात्मक परिस्थितीस सामोरे जावे लागत असल्याने तसेच अशा अनियमीत दिनचर्येमुळे त्यांच्या जेवणाच्या वेळाही ठरलेल्या नसतात. या सर्वाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. अशा परिस्थितीत पोलीसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतुन पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे नुकतेच तेथील दवाखान्याचे नुतनीकरण करण्यात आले. तसेच तेथे नवीन पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यात आलेली आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२०/०५/२०२२ रोजी स.१०.०० ते दुपारी ०२.०० वा. च्या दरम्यान बहुद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबियांसाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर आरोग्य शिबीरामध्ये पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबिय यांच्या आरोग्य तपासणीमध्ये ( १ ) किडनी फंक्शन ( २ ) लिव्हर फंक्शन ( ३ ) काविळ , ( ४ ) कॅल्शियम , ( ५ ) मधुमेह , ( ६ ) कोलेस्ट्रॉल , ( ७ ) सीबीसी ( ८ ) पीसीओडी , ( ९ ) कॅन्सर अशा प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. सदर शिबिरामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबिय असे एकुण ८५ लाभार्थ्यांनी सहभाग घेवुन आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे. शिबीराकरीता आलेल्या पोलीस कुटुंबियांशी पोलीस अधीक्षक यांनी सुसंवाद साधला. सदर शिबीराकरीता रक्त तपासणीकरीता जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांचे पथक उपस्थित होते. तसेच शिबीर यशस्वी होण्याकरीता जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे सहकार्य लाभलेले आहे. सदर शिबीराचे ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, डॉ. श्रीमती इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी, वैद्यकिय अधिकारी डॉ.श्रीमती मिताली मोडक, श्री रमेश निकम, राखीव पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मानस संसाधन शाखा यांची उपस्थिती होती.

Comments